SOPs for Journalists: शनिवारी रात्री प्रयागराजमध्ये अतिक अहमद (Atiq Ahmad) आणि अशरफवर (Ashraf Ahmad) गोळ्या झाडण्यात आल्या. दोघांचा जागीच मृत्यू झाला. या हत्याकांडातील तिन्ही आरोपींनी मीडियाचे बनावट आयडी, कॅमेरा आणि माईक आयडी आणले होते. माध्यमांच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याने आता केंद्रीय गृह मंत्रालय सक्रिय झाले आहे. आता पत्रकारांसाठी एसओपी निश्चित करण्याची तयारी सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रकार आणि इतर माध्यमांच्या सुरक्षेचा विचार करून स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) ठरवण्यात येईल. यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय, पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली या दिशेने काम केले जाईल. अतीक अहमद यांच्या हत्येनंतर अतीक आणि अश्रफ यांना गोळ्या घालणाऱ्या हल्लेखोरांनी बनावट मीडिया आयडी वापरल्याने ही पावले उचलली जात आहेत. (हेही वाचा -Atiq Ahmed Shot Dead: पत्रकार बनून आले होते हल्लेखोर, गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक)
अतीक अहमदवर गोळ्या झाडणाऱ्या हल्लेखोरांनी म्हटले आहे की, 'आम्हाला जेव्हा माहिती मिळाली की अतीक आणि अशरफ यांना पोलिस कोठडीत आणले जात आहे, तेव्हा आम्हाला दोघांनाही मारायचे होते म्हणून आम्ही स्थानिक पत्रकारांसोबत गेलो.' आपल्याला गुन्हेगारीच्या जगात मोठे नाव कमवायचे होते, त्यामुळेच त्यांनी अतिक अहमदची हत्या केल्याचेही हल्लेखोरांनी सांगितले आहे.
MHA, under the leadership of PM Modi and guidance of HM Amit Shah, will prepare SOPs for safety and security of journalists, sources said
— Press Trust of India (@PTI_News) April 16, 2023
या हल्लेखोरांकडून माईक आयडी, प्रोफेशनल कॅमेरा आणि एनसीआर न्यूज नावाच्या बनावट चॅनलचे ओळखपत्रही सापडले आहे. पत्रकारांची उपस्थिती आणि पोलिसांची सुरक्षा यादरम्यान अशा हल्ल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच माध्यमांची सुरक्षाही धोक्यात आली आहे.