ट्राय (TRAI) ने टीव्ही वाहिन्यांच्या बाबतीत नवे नियम लागू केले आहेत. त्यासाठी टीव्हीच्या वाहिन्या पाहण्यासाठी दर आकारले जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी 7 ते 10 या वेळात केबल ग्राहकांना टीव्ही पाहण्यास मिळणार नाही आहे. तसेच केबल बंद ठेवण्यात आल्याने Error असे टीव्ही स्क्रिनवर दाखविले जात आहे.
ट्रायने ग्राहकांना वाहिनीनिवडीचे स्वातंत्र्य दिले, तर वाहिन्यांना त्यांचे दर ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले. नवीन नियमाप्रमाणे 80 टक्के महसूल ब्रॉडकास्टर्सना व उर्वरित 20 टक्के एमएसओ व एलसीओना देण्याचे ठरविण्यात आले आहे. हे प्रमाण बदलून ब्रॉडकास्टर्सना ना 30 टक्के, एमएसओना 30 टक्के व एलएसओना 40 टक्के द्यावे, अशी मागणी केबल संघटनांकडून करण्यात आली आहे. (हेही वाचा-केबल व्यावसायिकांचा संप; उद्या तब्बल तीन तास टीव्ही राहणार बंद)
या केबल व्यावसायिकांनी ‘ट्राय’च्या विरोधात आतापर्यंत न्यायालयात 27 याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे ट्रायने याची गंभीर दखल घेत केबल सुविधा बंद केली आहे.