Magadh Express Accident: बिहारच्या बक्सर(Buxar) मध्ये रेल्वे अपघात झाला आहे. कपलिंग तुटल्याने मगध एक्स्प्रेसचे (Magadh Express) दोन भाग झाले. अर्ध्या बोगी पुढे आल्या तर अर्ध्या बोगी काही अंतर दूर राहील्या दानापूर-बक्सर मुख्य मार्गावरील तुडीगंज स्थानकाजवळ ही घटना घडली. सकाळी 11.01 च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. 20802 डाउन मगध एक्स्प्रेस डुमराव स्थानकातून सकाळी 10.58 वाजता निघाली. तुडीगंज स्टेशनजवळ नुआनव गुमतीला पोहोचताच. एस-7 कंपार्टमेंटचे कपलिंग तुटले आणि एक्सप्रेसपासून वेगळे झाले. (हेही वाचा: Train Accident in Bihar: बिहारच्या समस्तीपूरमध्ये टळला मोठा रेल्वे अपघात, संपर्क क्रांती एक्स्प्रेसच इंजिन झालं डब्यांपासून वेगळं)
मगध एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्याने रेल्वेचा अपघात
VIDEO | Magadh Express derails on Buxar-DDU-Patna rail section.
(Source: Third Party)#Trainderailment pic.twitter.com/SwWzajwckT
— Press Trust of India (@PTI_News) September 8, 2024
एसी असलेला एस-7 डबा पुढे निघाला. उर्वरित डबे रुळावर थांबले. दरम्यान, रेल्वेमॅनच्या लक्षात येताच त्याने गाडी थांबवली. या अपघातानंतर डाऊन मेन लाइनवरील कामकाज ठप्प झाले आहे. या अपघातात एकही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त नाही. रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. एक्सप्रेसचे डब्बे जोडण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.