Uttarakhand Tragedy: उत्तराखंडमधील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावरून जात असताना बस घसरून अलकनंदा नदीत पडली. या दुर्घटनेत 14 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले आहे. बसमधील पर्यटक चोपटा येथे जात असतान रायतोली गावाजवळ सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये 26 जण प्रवास करत होते. (हेही वाचा- गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या कारचा अपघात, पाच जणांना उडवलं, अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, बस 200 मीटर खोल दरीत कोसळले आणि नदीत पडले. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. रुद्रप्रयान जिल्हा रुग्णालयात दोघांना मृत घोषित केले तर दोघांना ऋषिकेश येथील एम्समध्ये मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी तिघांची ओळख पटलेली नाही.
🚨 Uttarakhand: 8 Killed As Tempo Falls Into Gorge On Rishikesh-Badrinath National Highway .....!!#Accident pic.twitter.com/9DRHvEiq1O
— VISHAL SINGH (@Vishalk09340276) June 15, 2024
#WATCH | Rudraprayag Tempo Traveller accident: A total of 7 injured have been shifted to AIIMS Rishikesh.
As per IG Garhwal, 10 people have died in the accident. pic.twitter.com/rXWaGPUr4i
— ANI (@ANI) June 15, 2024
रुद्रप्रयाग जिल्हा रुग्णालयात दोघांना मृत घोषित करण्यात आले तर दोघांना ऋषिकेश येथील एम्समध्ये मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांपैकी तिघांची ओळख पटलेली नाही. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक करण सिंग याचा ही मृत्यू झाला. अपघातात बळी पडलेले प्रवाशी नोएडा, मथुरा, उत्तर प्रदेशातील झाशी, उत्तराखंड, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरियाणातील हल्दवानी येथील आहेत.
अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले. या अपघातानंतर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा चुराडा झाला आहे. बस अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला आहे अशी माहिती समोर आली आहे.