
Bulandshahr Honour Killing: बुलंदशहरमध्ये एका 18 वर्षीय मुलीची प्रेमसंबंधांमुळे हत्या केल्याचा (Honour Killing)धक्कादायक प्रकार घडला आहे. झोपेत असताना तिच्या वडिलांनी गोळ्या झाडून तिची हत्या(Daughter Murder) केली. मुलीचे गावातीलच एका व्याक्तीसोबत प्रेमसंबंध उघडकीस आले होते. त्यामुळे तिचे ठरलेले लग्न रद्द करावे लागले होते. प्रेमसंबंध संपवण्यासाठी कुटुंबीयांनी प्रयत्न करूनही मुलीने लग्न केले नाही. त्यानंतर हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी वडिलांनी शेतातच तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.(Bhopal Shocker: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आयकर विभागाला जंगलात सापडले 52 किलो सोने आणि 10 कोटी रुपये)
शेतातच मृतदेहावर अंत्यसंस्कार
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शेकुपूर गावात ही घटना घडली. ग्रामस्थांनी मुलीच्या संशयास्पद मृत्यूची माहिती स्थानिक पोलिसांना दिली तेव्हा ही बाब मंगळवारी उघडकीस आली. सुरुवातीला तरुणीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला होता. तपास केला असता कुटुंबीयांवर संशय आला, ज्यामुळे वडील, भाऊ आणि काका यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना नंतर सांगण्यात आले की अधिका-यांना सूचित न करता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. चौकशी दरम्यान, पीडितेचे वडील नवीन कुमार भांबावून गेले आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
प्रेमसंबंध
त्यांनी उघड केले की कुटुंबाने मुलीचे लग्न सिकंदराबाद येथील एका जणासोबत निश्चित केले होते. परंतु तिचे त्यांच्या गावातील एका पुरुषासोबत सुरू असलेले प्रेमसंबंधांमुळे ती लग्नास तयार होत नव्हती. त्यामुळे रागाच्या भरात कुमारने आपल्या मुलीवर ती झोपली असताना गोळ्या झाडल्या. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहावर शेतात अंत्यसंस्कार केले.
महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:
चाइल्डलाइन इंडिया – 1098; हरवलेली मुले आणि महिला - 1094; महिला हेल्पलाइन - 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग – 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन – 7827170170; पोलीस महिला आणि ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन - 1091/1291.