Budget 2022: ओमिक्रॉनमुळे यावर्षी Halwa Ceremony होणार नाही, 'लॉक-इन' दरम्यान कर्मचार्‍यांना देण्यात आली मिठाई
Halwa Ceremony (Photo Credit - ANI)

Budget 2022: दिल्लीतील साथीची परिस्थिती पाहता यावर्षी प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) च्या आधी होणारा पारंपारिक "हलवा समारंभ" (Halwa Ceremony) वगळण्यात आला आहे. केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले की, गेल्यावेळेप्रमाणेच यंदाही अर्थसंकल्प पेपरलेस असेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. गुरुवारी एका निवेदनात सरकारने म्हटले आहे की, "केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात चिन्हांकित करण्यासाठी मुख्य कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी 'लॉक-इन' दरम्यान यंदा हलवा समारंभाऐवजी मिठाई देण्यात आली. सध्याची साथीची परिस्थिती आणि आरोग्य सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्याची गरज लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.”

वित्त मंत्रालयाकडून दरवर्षी नॉर्थ ब्लॉक बेसमेंटमध्ये मुख्यालयात आयोजित केलेल्या हलवा सोहळ्याने अधिकाऱ्यांच्या "लॉक इन" कालावधीची सुरुवात होते. अर्थमंत्री पारंपारिक कढईत मिठाई शिजवतात आणि सहकाऱ्यांना देतात. नंतर हा हलवा बजेटवर काम करणाऱ्या सर्वांना वितरित केला जातो. (वाचा - Reservation in Promotion: SC/ST पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार)

दरम्यान, बजेट तपशील लीक होऊ नयेत याची खात्री करण्यासाठी, गुंतलेल्या अधिकाऱ्यांसाठी "लॉक-इन" कालावधी आहे, जो गुरुवारपासून सुरू झाला आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या बजेट प्रेसमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या कालावधीसाठी सर्व अधिकारी उपस्थित राहतात. केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर केल्यानंतरचं हे अधिकारी व कर्मचारी आपल्या प्रियजनांच्या संपर्कात येतात.

जनतेला मोबाइल अॅपमध्ये बजेट पाहता येणार आहे. यामध्ये अर्थसंकल्पीय भाषण, वार्षिक आर्थिक विवरण, अनुदानाची मागणी, घटनेने विहित केलेले वित्त विधेयक इत्यादींचा समावेश असेल. सरकारने सांगितले की, द्विभाषिक (इंग्रजी आणि हिंदी) मोबाइल अॅप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.