Bone Pieces Found In Prasadam: आंध्रच्या श्रीशैलम मंदिराच्या प्रसादात सापडले हाडांचे तुकडे; भक्ताची मंदिर व्यवस्थापनाकडे तक्रार
Srisailam temple (PC -x/@Santoshk92)

Bone Pieces Found In Prasadam: आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) श्रीशैलम मंदिराच्या (Srisailam Temple) प्रसादात (Prasad) हाडांचे तुकडे सापडल्याने (Bone Pieces Found In Prasadam) खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर मंदिर व्यवस्थापनाने तपास सुरू केला आहे. हैदराबाद (Hyderabad) मधील एका भक्ताला शुक्रवारी मंदिरात दिल्या जाणाऱ्या पुलिहोरा प्रसादमध्ये हाडांचे तुकडे आढळले. या घटनेमुळे मंदिर व्यवस्थापन आणि स्वयंपाकघरातील स्वच्छतेबाबत चिंता निर्माण झाली आहे.

हरीश रेड्डी नावाच्या भक्ताला दर्शनानंतर प्रसाद मिळाला होता, ज्यामध्ये भक्ताला हाडांचे तुकडे सापडले. यानंतर त्यांनी तात्काळ मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पुराव्यासह लेखी तक्रार केली. (हेही वाचा -Worms Found In Sandwich On IndiGo Flight: इंडिगो कंपनीच्या विमानत सँडविचमध्ये अळी, महिला प्रवाशाची तक्रार (Watch Video))

भक्ताने दिलेल्या तक्रारीला उत्तर देताना मंदिर प्रशासनाने या प्रकरणी चौकशी सुरू केल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. त्याचवेळी, भक्ताच्या प्रसादात सापडलेली वस्तू दालचिनीचे तुकडे असू शकते असा अंदाज मंदिर अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, Live Snail in Salad: फूड डिलिव्हरी अॅप स्विगी द्वारे ऑर्डर केलेल्या सॅलडमध्ये आढळली जिवंत गोगलगाय; व्हिडिओ व्हायरल, कंपनीने दिली 'ही' प्रतिक्रिया (Watch))

श्रीशैलम मंदिराचा इतिहास -

श्रीशैलम ज्योतिर्लिंग हे आंध्र प्रदेशच्या पश्चिमेकडील कुर्नूल जिल्ह्यातील नल्लमल्ला जंगलांमध्ये श्रीशैलम टेकडीवर वसलेले आहे. हे मंदिर मल्लिकार्जुन म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराचा इतिहास सातवाहन घराण्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. इतिहासकारांच्या मते, श्रीशैलम मंदिर दुसऱ्या शतकाच्या आसपास बांधले गेले. श्रीशैलम मंदिराचे गर्भगृह खूपच लहान आहे, त्यामुळे येथे एका वेळी फारसे लोक दर्शनासाठी जाऊ शकत नाहीत.