PM Narendra Modi (PC - ANI)

Death Threat To PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) माजी पंतप्रधान राजीव गांधींप्रमाणेच बॉम्ब हल्ल्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. मोदी सोमवारी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. या पत्रात पंतप्रधान मोदींना राजीव गांधींप्रमाणे बॉम्ब हल्ल्यात मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या पत्राच्या माहितीवरून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या कार्यालयात कोची येथील एका व्यक्तीने मल्याळम भाषेत लिहिलेले पत्र प्राप्त झाले. गेल्या आठवड्यात त्यांनी हे पत्र पोलिसांना सुपूर्द केले. पोलिसांनी पत्राची चौकशी सुरू केली असता, त्यात एनके जॉनी नावाच्या व्यक्तीचा पत्ता लिहिला होता. मूळचा कोचीचा रहिवासी असलेल्या जॉनीची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने पत्र लिहिल्याचा इन्कार केला. (हेही वाचा - Atiq Ahmed Murder Case: अतिक अहमद खून प्रकरणी SIT ला मिळाले मारेकऱ्यांचे मोबाईल; लवकरचं 'मास्टरमाइंड'चं नाव येणार समोर)

जॉनीने सांगितले की, पोलिसांनी पत्र त्याच्या हस्ताक्षराशी जुळले. या पत्रामागे त्यांचा हात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तो म्हणाला की, या धमकीमागे कोणीतरी असू शकते, ज्याला माझा राग आहे. ज्यांच्यावर मला संशय आहे त्यांची नावे मी सांगितली केली आहेत.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याशी संबंधित व्हीव्हीआयपी सुरक्षा योजना लीक केल्याबद्दल राज्य पोलिसांवर टीका केली आहे.