Delhi School Receives Bomb Threat (PC - ANI)

Delhi School Receives Bomb Threat: दक्षिण दिल्लीतील डिफेन्स कॉलनी भागातील इंडियन स्कूलमध्ये (Indian Public School) बॉम्ब असल्याची (Bomb Threat) माहिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, स्थानिक पोलीस, बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले असून शाळा रिकामी करून संपूर्ण शाळेची तपासणी करण्यात आली आहे. शाळेत एकही बॉम्ब सापडलेला नाही. पोलिसांचे सायबर पथक ईमेलशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी तपासात गुंतले आहेत.

ई-मेलद्वारे मिळाली बॉम्बची माहिती -

दक्षिण जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त चंदन चौधरी यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी 1:19 वाजता डिफेन्स कॉलनी परिसरात असलेल्या इंडियन पब्लिक स्कूलमध्ये बॉम्ब असल्याची माहिती ई-मेलद्वारे शाळा प्रशासनाला मिळाली. माहिती मिळताच बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले. (हेही वाचा - Bangalore School Bomb Threat: बंगळुरु येथील शाळेला बॉम्बने उडविण्याची ईमेलद्वारे धमकी, यंत्रणा सतर्क)

पोलिसांच्या पथकाने शाळा रिकामी केली. विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढून संपूर्ण कॅम्पस तपासला. मात्र, घटनास्थळी बॉम्ब सापडला नाही. ई-मेलशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी पोलिसांचे सायबर पथक तपासात गुंतले आहे. यापूर्वी गुरुग्राममधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचीही माहिती समोर आली होती आणि नंतर ती अफवा असल्याचे सिद्ध झाले होते.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दक्षिण जिल्ह्यातील इंडियन पब्लिक स्कूलमध्ये बॉम्ब असल्याची माहिती ईमेलद्वारे मिळाली होती. माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य पाहून बॉम्बशोधक पथक शाळेत पाठवण्यात आले. (हेही वाचा - Kolhapur Bomb Threat Call: सासऱ्याने सांगितला जावयाचा कारनामा, 'दारुच्या नशेत कोल्हापूर अंबाबाई मंदिर परिसरात बॉम्ब ठेवल्याचा फोन')

दरम्यान, 14 ऑक्टोबर रोजी रशियाची राजधानी मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्याने दिल्ली विमानतळावर खळबळ उडाली होती. त्याचवेळी तपासात बॉम्बची माहिती अफवा असल्याचे निष्पन्न झाले.