Bhagalpur Blast: बिहार (Bihar) मधील भागलपूर (Bhagalpur) मध्ये मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास शाहजंगी मैदानाजवळ अचानक बॉम्बस्फोट (Bomb Blasts) झाला, ज्यामध्ये तेथे खेळणारी 7 मुले जखमी झाली. या स्फोटात तीन मुले गंभीर भाजली असून, उर्वरित चौघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मायागंज रुग्णालयात रेफर केले.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका जोरात होता की बॉम्बचा आवाज सुमारे 1 किमी दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. शहर एसपी के. रामदास यांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी फॉरेन्सिक टीम हजर दाखल झाली आहे. हबीबपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहजन्ही मैदानात हा स्फोट झाला. (हेही वाचा - Kolkata Explosion: कोलकात्यातील एसएन बॅनर्जी रोडवर स्फोट; एक जण जखमी, पोलिस-फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू)
प्राप्त माहितीनुसार, मैदानावर खेळणाऱ्या मुलाच्या हाताला चेंडूसारखी वस्तू लागली. ही वस्तू त्यांना जवळच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली. मुहम्मद इर्शाद यांचा मुलगा मुहम्मद मन्ना याने त्या वस्तूला चेंडू समजून तो खाली फेकला. त्यानंतर मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटात त्याच्यासोबत उपस्थित असलेला त्याचा भाऊ गोलू, मोहम्मद आरिफ, मुहम्मद शाहीन आणि मुहम्मद छोटी, महंमद राजा आणि समर हे जखमी झाले. जखमींपैकी मन्ना आणि गोलू यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. (हेही वाचा - Nagpur Explosives Factory Blast: नागपूरमध्ये स्फोटके बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू, 5 जखमी)
उर्वरित पाच मुलांना त्यांच्या मानेवर, पोटात आणि हातामध्ये बॉम्बचे स्प्लिंटर लागल्याने किरकोळ जखमा झाल्या आहेत. अचानक मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक धावत आले. या स्फोटाची माहिती परिसरातील नागरिकांनी हबीबपूर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर तात्काळ पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.