Delhi College Bomb Threat: दिल्लीच्या राम लाल आनंद कॉलेजमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांची तात्काळ कारवाई सुरु
delhi police pc twitter

Delhi College Bomb Threat: दिल्ली विद्यापीठाच्या राम लाल आनंद कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी सकाळी ९. ३४ वाजता बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. डीसीपी दक्षिण पश्चिम रोहित मीना म्हणाले, घटनेची माहिती मिळताच पोलिस,  बॉम्ब निकामी पथक (बीडीएस) आणि बॉम्ब निकामी पथक (बीडीटी) घेऊन महाविद्यालयात पोहोचले आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. शोध आणि तपास सुरू आहे. अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही. या धमकीमुळे विद्यार्थ्यामध्ये घबराट निर्माण झाली आहे. दिल्ली पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे. हेही वाचा- मेलबर्न येथील 14 वर्षीय मुलीवर किशोरवयीनांचा हल्ला