Abandoned car प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Tamil Nadu Suicide Case: तामिळनाडू (Tamil Nadu) च्या पुडुक्कोट्टई जिल्ह्यात (Pudukkottai District) एका बेबंद कार (Car) मध्ये पाच जणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही कार त्रिची-कराईकुडी राष्ट्रीय महामार्गा (Trichy-Karaikudi National Highway) वर पार्क केलेली आढळली. स्थानिकांनी कारच्या आत मृतदेह पाहिल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती दिली. आत्महत्येच्या प्रयत्नादरम्यान कुटुंबाने विष प्राशन करून गाडीत कोंडून घेतल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, कुटुंबातील सदस्य सालेमचे रहिवासी होते, जे त्यांचे मृतदेह सापडलेल्या पुदुक्कोट्टई जिल्ह्यापासून सुमारे 200 किमी अंतरावर राहत होते. 50 वर्षीय व्यापारी मणिकंदन, त्यांची पत्नी नित्या, आई सरोजा आणि त्यांची दोन मुले अशी मृतांची नावे आहेत. (हेही वाचा -Gujarat Shocker: गुजरातमध्ये सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; 2.75 कोटींची थकबाकी न दिल्याने कुटुंबातील 9 सदस्यांनी केले विष प्राशन)

प्राथमिक तपासात पीडितांनी विष प्राशन केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण पुदुक्कोट्टई शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर पुष्टी होईल. पोलिसांनी कारमधून एक चिठ्ठीही जप्त केली आहे. हे कुटुंब सावकाराकडून आर्थिक ताणतणावाखाली होते का? त्यामुळेच त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलले का? याचा ते तपास पोलिस करत आहेत. (हेही वाचा -Sangli Mass Suicide: म्हैसाळमधील 9 जणांची आत्महत्या नसुन हत्याकांड, गुप्तधनाच्या कारणामुळं हत्या)

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी केरळमधील नेयतिंकारा येथील कूट्टाप्पाना येथे भाड्याच्या घरात एकाच कुटुंबातील तीन सदस्य मृतावस्थेत आढळून आले होते. अरापुरविला हाऊसमधील मणिलाल (50), त्यांची पत्नी मंजू (48) आणि मुलगा अभिलाल (18) अशी मृतांची नावे आहेत. जेवणात सायनाइड मिसळल्याने कुटुंबाचा मृत्यू झाला होता.  उधार घेतलेले पैसे परत  करू न शकल्याने मणिलाल आणि त्यांच्या कुटुंबाने हे कठोर पाऊल उचलले. त्यांच्या घरातून सुसाईड नोट सापडली होती. आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या करत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले आहे. मणिलाल तामिळनाडूमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय करत होता. मात्र, या व्यवसायात त्यांचे पैसे बुडाले. त्याने अनेक लोकांकडून सुमारे नऊ लाख रुपये उसने घेतले होते. व्याज भरण्यासाठी घेतलेले कर्ज फेडता न आल्याने त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी नेयतींकारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.