New Delhi Shocker: नवी दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची फॉर्च्युनर कार चोरीला गेली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. कार सर्व्हिस सेंटरसाठी दिल्लीतील गोविंदपूरी येथे घेऊन गेली होती. 19 मार्चला कार चोरीला गेल्याची माहिती आहे. कार चोरीला गेल्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आला आहे. पोलिस चोराचा शोध घेत आहे. (हेही वाचा- दिल्लीत नरेला भागातील कारखान्याला आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २० गाड्या दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या पत्नीची महागडी कार चोरीला गेली आहे. या घटनेमुळे राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. ही कार कोणी चोरली हे अद्याप समोर आले नाही.पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहे. देशातील सर्वांत मोठ्या राजकिय पक्षाच्या अध्यक्षाच्या पत्नीचीच कार चोरीला गेल्याची चर्चा आहे. दरम्यान देशातून अनेक महागड्या कार चोरीला गेल्याचा घटना घडत आहे.
पोलिसांनी या घटनी माहिती मिळताच, सुत्रांने कामे सुरु केली. अथक प्रयत्नानंतर ही चोरी झालेली कारचा अद्याप पता लागला नाही. त्यामुळे राजकारणात देखील चांगलीच खळबळ उडाली आहे. ही कार नेमकी कोणी चोरली हे देखील समोर आले नाही. पोलिसांनी सांगितले की, हिमाचल प्रदेश मध्ये जे पी नड्डा यांच्या पत्नीच्या नावावर कार रजिस्टर होती.