सेकंट हॅंड कार खरेदी करण्यासाठी एका दाम्पत्याने चक्क पोटच्या विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कन्नोज (Kannauj) परिसरात गुरुवारी (13 मे) घडली आहे. याप्रकरणी संबंधित बालकाच्या आजी आजोबांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी नवजात बालकाच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दाम्पत्यानी 3 महिन्यांपूर्वी एका बाळाला जन्म दिला होता. मात्र, तीन महिन्यानंतर या दाम्पत्याने आपल्या पोटच्या बाळाला विकून टाकले. परंतु, ही बाब बालकाच्या आजी-आजोबांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाणे गाठून हा संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीची मुलगी आणि जावायाने कार खरेदी करण्यासाठी त्यांच्या 3 महिन्यांच्या बालकाला एका व्यापाऱ्याला दीड लाख विकल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी या दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे सर्व गावकरी हैराण झाले आहेत. हे देखील वाचा-Most Populous Country: 2027 पूर्वीच चीनला मागे टाकून भारत होईल जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश- Report
नवजात बाळ अजूनही व्यावसायिकाच्या ताब्यात आहे. या प्रकरणी आम्ही दाम्पत्याची चौकशी सुरु आहे. या दाम्पत्याने नुकतीच एक सेकंड हँड कार खरेदी केली असल्याचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी सांगितले आहे. एका सेकंड हँड कारसाठी आपल्या पोटच्या गोळ्याला विकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. तसेच या प्रकरणातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.