Bihar News: बिहारच्या (Bihar) बेगुसराय जिल्ह्यात शनिवारी चोरीच्या संशयावरून चार अल्पवयीन मुलांना स्थानिकांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चार अल्पवयीन मुलांनी फाजिलपूर (Fazilpur) गावात एका दुकानातून बिस्किटांची काही पॅकेट आणि कुरकुरे चिप्सची काही पाकिटे चोरल्याचा आरोप केला. दुकान मालकाने त्याला पकडले आणि त्यानंतर संतप्त जमावाने हिसंकपणे मारहाण केली.
खांबाला बांधून मारहाण
सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. विरपूर पोलिस ठाण्यातील पथक पोहचल्यानंतर त्यांनी मुलांना यातून बाहेर काढले. मुलांना बेदम मारहाण केल्यामुळे त्यांना गंभीर जखमा झाल्या आहे. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय रुग्णालयता उपचार करण्यात येत आहे.
पोलिसांचा तपास सुरु
पोलिसांनी मुलांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यांची संतप्त जमावापासून सुटका केल्याची माहिती पालकांना देण्यात आली आहे. या घटनेचा कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे का हे शोधण्यासाठी सोशल मीडियावर तपासणी करण्यात येत आहे. असे वीरपूर पोलिस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली.