Bihar Election Results 2020 Republic Live Streaming: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांची (Bihar Assembly Election Results) मंगळवार, 10 नोव्हेंबर रोजी मतदान मोजणी होईल. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि 243 जागांवरील 3,755 उमेदवारांचे भवितव्य उघडकीस येईल. बहुतेक एक्झिट पोलमध्ये RJD प्रणित महागाठबंधनला स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे, परंतु कोणत्या पक्षाला किंवा युतीला बिहारचे (Bihar) सिंहासन मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) सकाळी आठ वाजल्यापासून ट्रेंड जाहीर करण्यास सुरुवात करतील, तर अंतिम चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. दरम्यान, सकाळपासून बिहार निवडणुकीचे निकाल समोर येईल आणि विविध वाहिन्या देखील लाईव्ह निकाल दाखवतील. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान झाले. (Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली, Bihar Assembly Election 2020 मुळे मानसिक तणाव वाढला, डायलिसिस करावे लागण्याची शक्यता)
रिपब्लिक टीव्हीवर बिहार निवडणूक निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा. बिहार निवडणुक निकालाचे संपूर्ण कव्हरेजवर आपण रिपब्लिक भारत वर लाईव्ह पाहू शकता. याशिवाय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरही निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. आपण रिपब्लिक भारत ऑनलाईनवर देखील या निवडणुकीच्या निकालांचे लाईव्ह कव्हरेज पाहू शकतात. बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा जागा आहेत. 243 जागांसाठी 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती ज्यात RJD-JDU च्या महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. RJD ला 80, JDUला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या.
27 ऑक्टोबर रोजी बिहार निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आणि 7 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आले. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार पहिल्या टप्प्यात 55.68 टक्के मतदान झाले, तर दुसऱ्या टप्प्यात 55.70 आणि तिसऱ्या टप्प्यात 57.78 टक्के इतके मतदान झाले. 2000 मध्ये नितीश पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले. 2010 मध्ये कुमार यांचा पक्ष पुन्हा सत्तेत आला आणि त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दर्शविला व पुन्हा मुख्यमंत्री झाले. 22 फेब्रुवारी 2015 रोजी नितीश कुमार यांनी आपले मुख्यमंत्रीपद कायम ठेवले. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री होतील, जे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांचे पुत्र आहेत.