An Indian Army Cheetah helicopter crashed in Bhutan | (Photo Credit : ANI)

भारतीय लष्कराच्या सैन्य प्रशिक्षण दल (IMTRAT) हेलिकॉप्टरला अपघात होऊन दोन पायलट जागीच ठार झाले. यातील एक पायलट भारतीय आहे तर दुसरा भूतानचा. प्राप्त माहितीनुसार भारतीय पायलटचे नाव रजनीश परमार (Rajneesh Parmar) असे आहे. धक्कादायक असे की, रजनीश परमार यांचा आज (शुक्रवार, 27 सप्टेंबर) वाढदिवस आहे. वाढदिनीच त्यांचे अपघाती निधन झाले आहे. या घटनेत मृत्यू झालेला भूतानी पायलट हा भारतीय लष्कराकडून प्रशिक्षण घेत होता.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ही घटना भूतानमधील योंगफ्लाला (Yongfulla) येथे दुपारी 1 वाजता घडली. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे नाव चेतक असल्याचे समजते. हे हेलिकॉप्टर हवेत झेपावल्यानंतर काही वेळातच संपर्क यंत्रणेपासून दूर गेले. हे हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेश राज्यात योंगफ्लाला परिसरात कर्तव्यावर असल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा, जम्मू-काश्मीर: बडगाम येथे हेलिकॉप्टर कोसळून महाराष्ट्रातील पायलट निनाद मांडवगणे यांचा मृत्यू)

एएनआय ट्विट

हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचे समजतात लष्कराच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, मदत आणि बचाव कार्यास सुरुवात केली. प्राप्त माहितीनुसार हेलिकॉप्टरचे अवशेष हटविण्याचे काम सुरु आहे.