Bhagwant Mann (Photo Credit - Twitter)

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Election 2022) आम आदमी पक्षाकडून (AAP) भगवंत मान (Bhagwant Mann) हे मुंख्यमंत्री चेहरा म्हणुन उमेदवार असणार आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये मुख्यमंत्री चेहरा बनल्यानंतर मान म्हणाले की, पंजाबला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरुणांना रोजगार देण्यावर आमचा भर असेल. राज्यातून 'माफिया राज' संपणार. ते म्हणाले की, मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, इथपर्यंत पोहोचण्याचा विचार कधीच केला नव्हता. जनतेच्या आशीर्वादाने आमच्यासोबचत आहे. आम्ही नक्कीच जिंकु. एका खाजगी वाहिनीशी बोलताना भगवंत मान म्हणाले की, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी जालंधर, पटियालसह राज्यातील अनेक ठिकाणी तिरंगा रॅली काढल्या. यामध्ये पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याचे नाव निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले होते. ते म्हणाले की, पक्षातर्फे बैठक झाली, त्यात माझ्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. पण मी म्हणालो की एकदा जनतेला विचारावे. यानंतर आम्हाला हा प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री चेहऱ्याच्या नावाची घोषणा केली.

Tweet

पंजाबला पूर्वीपेक्षा चांगले बनवण्यासाठी आम्ही काम करू

भगवंत मान म्हणाले की, प्रत्येक पक्षात आणि प्रत्येक राज्यात मुख्यमंत्री कोट्याच्या आधारे निवडले जातात. पण इथे तसे नाही. मी पंजाबींच्या कोट्यातून मुख्यमंत्री होणार आहे. त्याचवेळी त्यांना कोणता पंजाब बनवायचा आहे, असे विचारण्यात आले. यावर मान म्हणाले, असा पंजाब आम्हाला घडवायचा आहे, जिथे बेरोजगारांना आत्महत्या करायची गरज नाही पडणार. पंजाबला पूर्वीपेक्षा चांगले बनवण्यासाठी आम्ही काम करू असे भगवंत मान म्हणाले. (हे ही वाचा COVID-19 Treatment: केंद्र सरकार कडून कोविड 19 च्या उपचारपद्धतीसाठी नवी नियमावली जारी)

विरोधक बिनबुडाचे आरोप करतात - भगवंत मान

त्याचवेळी आपल्या दारूच्या व्यसनाबद्दल बोलताना भगवंत मान म्हणाले की, विरोधकांकडे माझ्याबद्दल काही बोलायचे नाही. माझी स्वच्छ प्रतिमा आहे. माझ्यावर कारवाई होऊ शकत नाही, त्यामुळे विरोधक संतापले आहेत. ते म्हणाले की, ईडी, सीबीआय आणि इतर सरकारी यंत्रणा माझ्या मागे लावता येणार नाही. लोकांनी मला पाठिंबा दिला आहे. लोकसभेतील माझी सर्वोत्तम कामगिरी आहे. मी रात्रीपर्यंत रॅली करतो. अशा स्थितीत विरोधकांकडे काहीच नाही. विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत.

आम आदमी पक्षावर तिकीट विकल्याच्या आरोपाबाबत मान म्हणाले की, तसे नाही. ज्यांना तिकीट मिळत नाही ते लोक असे प्रकार करतात. जर कोणी हे सिद्ध केले तर आम्ही त्या जागेवरून निवडणूक लढवणार नाही. त्याचबरोबर 'आप' हा बाहेरचा पक्ष असल्याबद्दल ते म्हणाले की, बाहेरचे असे काही नाही. पंजाबचे युनिट येथे आहे. पंजाबमध्ये आम्ही विरोधी पक्षात आहोत. येथे निर्णय घेतले जातात.