परवानगी शिवाय धार्मिक कार्यक्रमांना बंदी, आता भागवत कथा वाचन कार्यक्रमांवरही गदा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सार्वजनिक ठिकाणी परवानगी शिवाय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बुधवारी ग्रेटर नोएडा (Greater Noida) च्या पोलीस अधिकाऱ्यांनी सेक्टर-37 येथे हुकमत असलेल्या जागेवर भागवत कथा (Bhagavat Katha) वाचन कार्यक्रमांसाठी परवानगी नाकारली आहे.तर आता प्रथम सार्वजनिक ठिकाणी नमाज पाठणाच्या बंदीनंतर भागत कथा वाचनावर ही गदा आणली आहे.

नोएडा मधील सेक्टर- 58 येथे परवानगी शिवाय नमाज पठणावरुन बंदी घालण्यात आल्यानंतर खूप गोंधळ घातला जात आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटकसुद्धा केली आहे. तर सेक्टर-37 येथील हुकमत जागा खाली असल्याने काही लोकांनी परवानगी शिवाय भागवत कथा वाचनाच्या कार्यक्रमासाठी मंडपाची उभारणी केली. तर स्पीकर्स आणि माईकसुद्धा लावण्यात आले होते.

पंरतु सेक्टर-37 मधील अधिकाऱ्यांनी भागवत कथा वाचनासाठी लावण्यात आलेले मंडप काढून टाकले. त्यामुळे उपस्थित महिलांनी अधिकाऱ्यांच्या अशा वर्तवणुकीमुळे त्यांनी खडे बोल सुनावले.