Bengaluru Rameshwaram Cafe Blast (PC - X/@sanjusadagopan)

Rameshwaram Cafe Blast: बेंगळुरू (Bengaluru) च्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट (Rameshwaram Cafe Blast) प्रकरणात NIA ने पश्चिम बंगाल (Bangal)मधून दोन आरोपींना अटक (Arrest) केली आहे. एनआयएने या दोन आरोपींवर प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर शाजिब हुसेन अशी तपास यंत्रणेने पकडलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. मुसाविर हुसेन शाजेब याच्यावर कॅफेमध्ये स्फोटक यंत्र पेरल्याचा आरोप आहे आणि अब्दुल मतीन ताहा हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, NIA टीम शुक्रवारी सकाळी कोलकातामधील एका लपण्याच्या ठिकाणी पोहोचली, जिथे दोन्ही संशयित बनावट नावाने राहत होते. एनआयए, केंद्रीय गुप्तचर संस्था आणि पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळ पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. (वाचा - Rameshwaram Cafe Blast Case: रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी NIA ने दोन संशयितांवर जाहीर केले प्रत्येकी 10 लाखांचे बक्षीस)

मुसावीर हुसैन शाजिबने कॅफेमध्ये आयईडी पेरला होता. तसेच अब्दुल मतीन ताहा हा या कटाचा मास्टरमाईंड होता. गेल्या आठवड्यात, एजन्सीने कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील तीर्थहल्ली येथील रहिवासी शाजेब आणि ताहा यांची ओळख पटवली होती. त्याला अटक करण्यासाठी कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये 18 ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. (वाचा - Bengaluru Rameshwaram Cafe Blast: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित व्यक्तीचे आणखी एक CCTV फुटेल आले समोर, पहा व्हिडिओ)

तथापी, 1 मार्च रोजी बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात अनेक ग्राहक आणि हॉटेल कर्मचारी जखमी झाले होते. 29 मार्च रोजी, एजन्सीने दोन मुख्य आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.