Bengaluru  Crime: फुड डिलीव्हरी बॉयने घरात घुसून तरुणीसोबत केले असे काही; बेंगळूरू येथील धक्कादायक घटना
Representative Image

Bengaluru  Crime: फुड डिलिव्हरी बॉयने एका 30 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना 17 मार्च रोजी घडली आहे. ही घटना बेंगळूरू येथील ब्रुकफील्डजवळील AECS लेआउटमध्ये घडली. ही घटना सायंकाळी 6.45 च्या दरम्यान घडली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.पीडित महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. (हेही वाचा- दिल्लीत वैद्यकीय तपासणीदरम्यान मद्यधुंद व्यक्तीने तीन डॉक्टरांवर केला हल्ला)

पीडित महिलेने सांगितले की,ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲपवरून डोसा मागवला होता. 6.30च्या दरम्यान डिलिव्हरी बॉय आला होता. डिलिव्हरी बॉयला थोडे पाणी हवे का अशी विचारणा केली. त्यानंतर त्याला पाण्याचा ग्लास आणून दिला. पाणी पिल्यानंतर तो लगेत निघून गेला. काही वेळातच दरवाजा पून्हा वाजला. दार उघडल्यानंतर 20 वर्षाचा मुलगा उभा होता.जो की डिलिव्हरी बॉय होता. त्याने विचारले की, मॅम तूमचे वॉशरूम वापरू शकतो का? खूप अर्जेंट आहे. लगेच त्याला वॉशरुम दाखवले. तो बाहेर येताच त्याला निघण्यास सांगितले. तो म्हणाला, मला पुन्हा थोडे पाणी मिळेल का ? त्याला दाराजवळ उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणचे तो माझ्या मागे किचनमध्ये आला. त्याने काहीतरी कुजबुज केले आणि हात घट्ट धरला. त्यानंतर मी आरडोओरड केला. हात धरल्यानंतर मी एक तवा उचलला आणि त्याच्या पाठीवर मारला. तो घराबाहेर पळाला. मी त्याच्या मागे धावत लिफ्टकडे गेलो. पण तो पायऱ्यांवरून पळून गेला.

या सर्व घटनेची माहिती 112 पोलिस हेल्पलाईन वर कॉल करून सांगितली.  पोलिस ठाण्यात देण्यात आली. व्हाईटफिल्ड पोलिस स्टेशनची होसला टीम आली. त्यांनी तिला HAL पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यास सुचवले. पीडितेने पोलिसांना सांगितले की, डिलिव्हरी बॉय दाढीवाला होता आणि त्याने तोंडाला मास्क लावला होता.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राहत असलेल्या चार मजली इमारतीतील रहिवाशांनी ठरवले आहे की, डिलिव्हरी बॉईजना आवारात प्रवेश दिला जाणार नाही आणि ते गेटमधूनच फुड घेतील. डिलिव्हरी बॉय इमारतीत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.