बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता येणार?
प्रधानमंत्री शेख हसीना (फाइल फोटो)

बांगलादेशात(Bangladesh)सार्वत्रिक निवडणुका रविवारी पाड पडल्या. त्यानंतर आता मतमोजणी सुरु झाली असून शेख हसीना (Sheikh Hasina) यांची सत्ता येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यावरुन पुन्हा चौथ्या वेळेस हसीना यांची सत्ता येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

निवडणुकी दरम्यान, विविध ठिकाणी सत्ताधारी अवामी लीग आणि प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी हिंसाचार झाल्याची घटना घडली. या हिंसाचारामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मतमोजणी चालू असलेल्या 29 जागांवर शेख यांच्या पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तसेच आघाडीवर असलेल्या उमेदवारांना 10 हजारहून अधिक मत मिळाली आहेत.

या प्रकरणी खलिया झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाने आक्षेप घेतला आहे.तर निवडणुकीतच्या मतदानात काहीतरी घोळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच संसदेच्या 330 पैकी 299 जागांसाठी मदतान पार पडले आहे.