विप्रोचे सीइओ तसेच आयटी (IT) क्षेत्रातील एक नावाजलेले उद्योगपती अझीम प्रेमजी (Azim Premji) यांना फ्रांसच्या सर्वोच्च नागरिकाचा सन्मान (France's Highest Civilian Award) प्राप्त होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रेमजी यांना याच महिन्यात फ्रांसकडून देण्यात येणाऱ्या या ‘नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ (Knight of the Legion of Honour) पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. भारतात फ्रांसचे राजदूत अलेक्झांडर जिग्लर हा पुरस्कार प्रेमजी यांना प्रदान करतील.
भारतामधील आयटी उद्योगाचा विकास आणि फ्रांसमधील आर्थिक प्रगतीमध्ये दिले गेलेले योगदान यासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. याचसोबत अझीम प्रेमजी फाऊंडेशन आणि युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे एक समाजसेवी म्हणून समाजामध्ये केलेल्या कार्याचा गौरवही केला जाणार आहे. (हेही वाचा : Ironman Title : विरारचे शंकर उथळे ठरले आयर्नमॅन किताब जिंकणारे पहिले पोलीस)
प्रेमजी यांच्याआधी बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी आणि शाहरुख खान यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. फ्रांसचे राजदूत एका टेक परिषदेमध्ये उपस्थित राहण्यासाठी 28-29 नोव्हेंबर रोजी बेंगळूरू येथे असणार आहेत. त्यावेळी हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे.