Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कौटुंबिक वादातून (Family disputes) हत्या (Murder) झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. दरम्यान सेक्टर 39 पोलिसांच्या हद्दीतील हाजीपूर (Hajipur) गावात बुधवारी सकाळी 42 वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि सासूला कथितरित्या आग लावल्यानंतर स्वतःला पेटवून घेतले. उपचारा दरम्यान त्या व्यक्तीचा नंतर मृत्यू झाल्याचे पोलिसांनी (UP Police) सांगितले आहे. भाजलेल्या दोन्ही महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना सकाळी सातच्या सुमारास घडली. आम्ही एक गोंधळ ऐकला आणि जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा आम्ही दोन महिला आणि एक पुरुषाला आगीत जळताना पाहिले. आम्ही ताबडतोब पोलिसांना बोलावले त्यांनी तिघांनाही रुग्णालयात घेऊन नेले, असे परिसरातील रहिवासी सांगितले आहे.

पोलिसांनी महिलांची ओळख लक्ष्मीआणि त्यांची आई किरण अशी सांगितली आहे. तर मोहनदास यांनी हा प्रकार केल्याचे सांगितले. हे सर्व हाजीपूर येथे राहणारे असून पश्चिम बंगालचे रहिवाशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचा घटस्फोट झाला होता. तरीही त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होत होते. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे लक्षात येत आहे. रुग्णालयात उपचार घेत असताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित दोन महिला गंभीर जखमी आहेत.  ही घटना उत्तर प्रदेशातील हाजीपूर गावातून घडली आहे. हेही वाचा Marital Rape: विवाहीत पत्नीच्या इच्छेविरुद्ध पतीने केलेला संभोग, कोणतीही लैंगिक कृती बलात्कार नव्हे- कोर्ट

महिला आणि तिची आई हाजीपूरमध्ये भाड्याच्या घरात राहतात. एकाच गावात स्वतंत्रपणे राहणारा दास सकाळी पत्नीच्या ठिकाणी आला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात त्याने तिच्यावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याचे दिसते.  जेव्हा महिलेच्या आईने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने तिलाही पेटवून दिले.  मग त्या माणसाने स्वतःवरही रॉकेल ओतले. स्वतःला पेटवून घेतले आहे. अशी माहिती  पोलीस उपायुक्त राजेश एस. यांनी दिली आहे.

या दाम्पत्यांना तीन मुले आहेत. या घटनेत मोहनदास हा 90 टक्के भाजला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. तर महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. मोहनदासच्या मृत्यूआधी पोलिसांकडून त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी सांगितले आहे, या प्रकरणी आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.