Delhi Police Assistant Sub Inspector Commits Suicide: उत्तर दिल्लीतील सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन (Civil Lines Police Station) मध्ये एका सहाय्यक उपनिरीक्षकाने (Assistant Sub-Inspector) त्याच्या अधिकृत बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली. अधिकाऱ्यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. मृत पोलिस अधिकाऱ्याकडून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या विजयने सोमवारी रात्री उशिरा स्वत:वर गोळी झाडली.
विजय हा हिमाचल प्रदेशचा रहिवासी होता. तो 1994 मध्ये पोलिसात दाखल झाला होता, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. मृत विजयच्या कुटुंबीयांना त्याच्या आत्महत्येची माहिती देण्यात आली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्हे आणि फॉरेन्सिक पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. प्राथमिक तपासात त्याला काही घरगुती समस्या असल्याचं आढळलं. भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम 194 (तपास) अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जात आहे. (हेही वाचा - Police Sub-Inspector Shot Dead in Ranchi: रांचीमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या, प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना)
मार्च महिन्यात दिल्लीतील एका उपनिरीक्षकाने त्याच्या फ्लॅटमध्ये पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. के गणेश असे मृत पोलिस अधिकाऱ्याचं नाव होतं. तो तेलंगणाचा रहिवासी होता. के गणेश हा सध्या दिल्लीतील मधुर विहार पोलीस ठाण्यात तैनात होता. (हेही वाचा -Girl Shot Dead in Patna: पाटण्यात 4 वर्षीय मुलीची गोळ्या झाडून हत्या; अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल)
प्राप्त माहितीनुसार, गणेशची अपार्टमेंट आतून कुलूपबंद असल्याचे आढळल्याने पोलिसांचे पथक इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटच्या बाल्कनीत चढले. काचेच्या फलकातून डोकावून पाहिल्यावर, त्यांना एसआय गणेशला त्याच्या मांडीवर पिस्तूल घेऊन मृतावस्थेत पडलेला आढळला. त्यानंतर पोलिसांनी गणेश यांचा मृतदेह ताब्यात घेतला.