Asaduddin Owaisi on Navneet Rana: '15 सेकंद नाही 1 तास घ्या, पण आता करुनच दाखवा', नवनीत राणा यांना असदुद्दीन ओवैसी यांचे प्रत्युत्तर (Watch Video)
Photo Credit - X

Asaduddin Owaisi on Navneet Rana: AIMIM प्रमुख आणि हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या '15 सेकंद लागतील' या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे. 'मी तुम्हाला पंतप्रधान मोदींना 15 सेकंद देण्यास सांगतो काय करायच ते करा आम्ही घाबरत नाही,' असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले. मुख्तार अन्सारी आणि अखलाख यांच्यासोबत तुम्हीही तेच कराल का? पुढे ओवैसी म्हणाले की, तुम्ही 15 सेकंदांच्या ऐवजी तर 1 तास घ्या. तुमच्यात थोडीतरी माणुसकी उरली आहे की नाही हे आम्हालाही बघायचे आहे. (हेही वाचा: Navneet Rana on Akbaruddin Owaisi’s Speech: 'तुम्हाला 15 मिनिटं पण आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील'; बालेकिल्ला हैदराबाद मध्ये नवनीत राणा ओवैसी बंधूंवर कडाडल्या)

असदुद्दीन ओवेसी पुढे म्हणाले की,'देशात पंतप्रधान तुमचा आहे. तुमची आरएसएस आहे. देशात सर्व काही तुमचे आहे. तुम्हाला कोण अडवणार? कुठे यायचे ते सांगा. आम्ही तिथे येऊ,'असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

दरम्यान, काल बुधवारी नवनीत राणा भाजपच्या हैद्राबादच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी हैदराबादमध्ये हजेरी लावली होती. त्या दरम्यान, सभेला संबोधीत करताना त्यांनी अकबरुद्दीन ओवैसी(Akbaruddin Owaisi)यांनी 2013 मध्ये एका भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं होतं. '१५ मिनिटे पोलीस हटवा आम्ही काय करू शकतो, हे दाखवून देऊ', असे वादग्रस्त विधान अकबरुद्दीन ओवैसी यांनी केले होते. त्यावर 'तुम्हाला १५ मिनिटे लागतील आम्हाला १५ सेकंद लागतील', असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या.

नवनीत राणा यांच्या वक्तव्याला असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  'तुम्ही 15 सेकंदांच्या ऐवजी तर 15 तास घ्या. पण आता तुम्ही करून दाखवा, तुमच्यात थोडीतरी माणुसकी उरली आहे की नाही हे आम्हालाही बघायचे आहे.' असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत.