Andhra Pradesh Chief Minister YS Jagan Mohan Reddy (PC- ANI)

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकार राज्यात अनोखा प्रयोग राबवणार आहे. आता या राज्यात 3 राजधान्या असणार आहेत. यासंदर्भात सोमवारी विधानसभेत 3 राजधान्यांचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. 'कुरनूल', (Kurnool) 'विशाखापट्टनम' (Visakhapatnam) आणि 'अमरावती', (Amaravati) अशी या राजधान्यांची नावे आहेत. यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तीन राजधान्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती. सोमवारी हे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं आणि या विधेयकाला मंजुरी देण्यात आली.

या विधेयकानुसार, आता आंध्र प्रदेशची प्रशासकीय कार्यकारी राजधानी 'विशाखापट्टनम' असणार आहे. तर 'अमरावती' ही विधिमंडळ आणि 'कुरनूल' ही आंध्र प्रदेशची न्यायिक राजधानी असणार आहे. (हेही वाचा - Budget 2020: पारंपरिक 'हलवा सोहळ्या'ने अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांची छपाई सुरू; जाणून घ्या काय आहे काय आहे ही परंपरा (Video))

या विधेयकाला विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. या विधेकावरील चर्चेदरम्यान गोंधळ घालणाऱ्या तेलुगु देशम पार्टीच्या 17 आमदारांना अध्यक्षांनी दिवसभरासाठी निलंबित केलं. तसेच यासंदर्भात माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंदोलन केलं. परंतु, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. सोमवारी रात्री उशिरा नायडू यांची सुटका करण्यात आली.