डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anand Raj Ambedkar) यांनी कॉंग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला असल्याचे वृत्त काही इंग्रजी वृत्तपत्रांनी दिले होते, मात्र हे पूर्णतः चुकीचे असल्याचे समोर आले आहे. स्वतः आनंदराज आंबेडकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आंबेडकर यांचा कॉंग्रेसप्रवेश ही फक्त अफवा ठरली आहे.
आज जी बातमी लोकमत मध्ये देण्यात आली आहे ती ध़ं।दात खोटी असून तीचा मी जाहीर निषेध करतो तसेच दिली प्रदेश रिपब्लिकन सेना बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
— Anandraj Ambedkar (@AnandrjAmbedkar) May 5, 2019
शनिवारी, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (Sheila Dikshit) यांच्या उपस्थितीत हा प्रवेशसोहळा पार पडला असे सांगण्यात आले होते. मात्र अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असा कोणताही पक्षप्रवेश झाला नाही, मुद्दाम चुकीचे वृत्त पसरवले गेले आहे. तसेच आनंदराज यांनी केलेल्या ट्विटनुसार दिल्ली प्रदेश रिपब्लिकन सेना बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीदेखील मिळत आहे.