Banquet Hall Fire In Noida (फोटो सौजन्य - PTI)

Banquet Hall Fire In Noida: नोएडा (Noida) येथील बँक्वेट हॉल (Banquet Hall) मध्ये बुधवारी पहाटे 3 च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत (Fire) एका इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झाला. कोट्यवधी रुपये किमतीचा बँक्वेट हॉल जळून खाक झाला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

पोलिसांनी सांगितले की, सेक्टर-113 पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्फाबाद गावाजवळील लोटस ग्रेनेडियर बँक्वेट हॉलमध्ये पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. पोलीस उपायुक्त (झोन 1) रामबदन सिंग यांनी सांगितले की, अग्निशमन विभागाचे कर्मचारी पहाटे 3:40 च्या सुमारास पाच फायर इंजिनांसह घटनास्थळी पोहोचले. मात्र, आग वाढतच गेल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या आणखी 10 गाड्या रवाना करण्यात आल्या. आत अडकलेल्या अनेकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, प्रवेंद्र नावाच्या इलेक्ट्रिशियनचा आगीत मृत्यू झाला. (हेही वाचा - Hyderabad Fire Breaks: हैदराबादमध्ये घराला लागलेल्या आगीत गुदमरून जोडप्याचा मृत्यू)

नोएडातील बँक्वेट हॉलला आग, पहा व्हिडिओ -

मुख्य अग्निशमन अधिकारी प्रदीप कुमार चौबे यांनी सांगितले की, हॉलची मुख्यतः लाकडी रचना आग वेगाने पसरण्यास कारणीभूत ठरली. आग आटोक्यात आणण्यासाठी विभागाला सुमारे तीन तास लागले. याच बँक्वेट हॉलला गेल्या वर्षी 21 नोव्हेंबरलाही आग लागली होती.