Hyderabad Fire Breaks: हैदराबादमध्ये एका घरात ठेवलेल्या फटाक्यांना आग लागल्याने गुदमरून एक व्यक्ती आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील आणखी एक सदस्य जखमी झाला. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा हे कुटुंब जेवण बनवत असताना अचानक गॅसच्या शेगडीची ठिणगी फटाक्यांच्या पेटीवर पडली. फटाक्यांना आग लागली आणि दोन खोल्यांच्या घरात धुराचे लोट पसरले, परिणामी दाम्पत्याचा गुदमरून मृत्यू झाला. हे देखील वाचा: Akhnoor Encounter: सुरक्षा दलाच्या ताफ्यावर गोळीबार केल्यानंतर दुसरा दहशतवादी ठार, चकमकीत 'फँटम' श्वान शहीद
रेन बाजार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, घरात उपस्थित असलेल्या आणखी एका मुलीला गुदमरल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृताचे वय अंदाजे 50 वर्षे असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.