गोव्याचे मुख्यमंत्रीचे मनोहर पर्रिकर (Photo Credits: PTI/File)

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांना आज रविवारी(3 मार्च) पुन्हा उपचारांसाठी गोमेकॉत आले होते. विविध वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांना काही वेळाने घरी पाठविण्यात आले. सध्या त्यांच्यावर दोनापॉल येथे त्यांच्या खासगी निवासस्थानी उपचार सुरू आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्रीकर यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून अंतर्गत रक्तस्राव चालू आहे यासाठी काही चाचण्या घेण्यात आल्या. सर्व काही नियंत्रणात असल्याचे सांगितले गेले. पर्रीकर फेब्रुवारी 2018 पासून दुर्धर आजाराने त्रस्त असून गोवा, मुंबई, दिल्ली तसेच अमेरिकेतही त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यात गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात रात्रीच्यावेळी तातडीने दाखल करावे लागले होते. त्यांच्या पोटात रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयातील दोन तज्ज्ञ डॉक्टरांनागोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात बोलवून घ्यावे लागले होते.