![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/10/bomb-threat.jpg?width=380&height=214)
Ahmedabad Bomb Threat: अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरिल एका विमानात बॉम्ब असल्याचे पत्र सापडले होते. या पत्रामुळे विमानात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आज सकाळी आंतरराष्ट्रीय विमानात बॉम्बची धमकी देणारे पत्र सापडले, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी विमानात शोधमोहीम सुरु केली होती. शोधमोहीम केली असता सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या जेद्दाह-अहमदाबाद विमानात आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. स्थानिक पोलीस, बॉम्ब शोधक पथक (बीडीडीएस) आणि सुरक्षा यंत्रणांना एका सीटखाली धमकीचे पत्र सापडल्यानंतर विमानाची झडती घेण्यात आली आहे, असे गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त शरद सिंघल यांनी सांगितले. ते म्हणाले, "जेद्दाहून प्रवाशांना घेऊन जाणारे विमान सकाळी अहमदाबाद विमानतळावर उतरले, त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. हेही वाचा: Fight in Gwalior: 5 रुपयावरून प्रवासी आणि ड्रायव्हरमध्ये हाणामारी, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर धमकीची चिठ्ठी सापडली होती. स्थानिक पोलिसांनी, सुरक्षा यंत्रणांसह तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, पुढील तपास सुरु केला असून, " प्रत्येक प्रवाशाच्या बोटांचे ठसे आणि हस्ताक्षर तपासण्यात आले आहेत, आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही," असे ते पुढे म्हणाले.