Sarnath Express Shooting: सारनाथ एक्सप्रेसमध्ये घडला चुकून गोळीबार, एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू
Firing in Train PC Twitter

Sarnath Express Shooting: छत्तीसगढ येथील रायपूर (Raipur) रेल्वे स्थानकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत रेल्वे संरक्षण विशेष बलच्या एका जवानाला आणि एका प्रवासाला गोळी लागली आहे. या त दोघें ही गंभीर जखमी झाले आहे. ही घटना सारनाथ एक्सप्रेस ट्रेनमध्ये घडली आहे. सकाळी 6 च्या सुमारास ही घडली अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. हेही वाचा- लग्नाच्या मिरवणुकीत वराकडून चुकून पिस्तुलातील गोळी झाडल्याने लष्कर जवानाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, अचानक झालेल्या गोळीबारात दोघांना गोळी लागल्याने जखमी झाले आहे.  सकाळी कॉन्स्टेबल दिनेश चंद्र रेल्वेच्या एस -2 डब्यातून बाहेर जात होते दरम्यान त्यांचे सर्व्हिस वेपन चूकून निसटले आणि त्यांच्या छातीत गोळी लागली. वरच्या बर्थवर झोपलेल्या एका प्रवाशाला त्याच्या  पोटाला गोळी लागून जखम झाली. मोहम्मद दानिश असे त्या जखमी तरुणाचे नाव आहे. दोघांना खासगी  रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा गोळीबार अदाधुंद असल्याचे सांगत आहे.

दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. दरम्यान कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. मृत जवान हा राजस्थानचा रहिवासी होता. या प्रकरणी पोलिस तपास करत आहे. या घटनेनंतर ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली होती.