Sarabjit Kaur And Arvind Kejriwal (Photo Credit - FB&PTI)

दिल्ली (Delhi) आणि आता पंजाबमध्ये (Punjab) प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आम आदमी पार्टी (AAP) सरकार स्थापनेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहे. 16 मार्च रोजी भगवंत मान (Bhagwant Mann) पंजाबचे नवे मुख्यमंत्री (Punjab CM) म्हणून शपथ घेणार आहेत. सरकार स्थापनेसोबत आम आदमी पार्टी आणखी एक इतिहास रचणार आहे. पंजाब विधानसभेत पहिल्यांदाच महिला सभापतीची (Woman Speaker) नियुक्ती केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाच्या आमदार सरबजीत कौर (AAP MLA Sarabjit Kaur) यांची पंजाब विधानसभेच्या प्रथम महिला सभापती म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. सभापती बनण्याच्या शर्यतीत बलजिंदर कौर यांच्या नावाचाही समावेश आहे. सरबजीत कौर यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. आम आदमी पार्टीही बलजिंदर कौर यांच्या नावावरही विचार करत आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदी फक्त महिलाच आमदार असेल

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार सरबजीत कौर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्याशिवाय या पदासाठी अनेक प्रबळ दावेदार आहेत. दुसरीकडे, केवळ महिला आमदारालाच विधानसभा अध्यक्ष बनवण्यावर पक्षाचे एकमत झाले आहे. तसे झाल्यास तेही एक ऐतिहासिक पाऊल ठरेल, कारण आजपर्यंत एकही महिला आमदार पंजाब विधानसभेच्या अध्यक्ष होऊ शकलेली नाही. सरबजीत कौर हे आप पक्षातील सर्वात तेजस्वी नेत्यांपैकी एक आहे. (हे ही वाचा Kapil Sibal On Soniya Gandhi: कपिल सिब्बल यांचा सोनिया गांधींवर थेट हल्ला, म्हणाले- गांधी परिवाराने माघार घ्यावी, दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी)

भगवंत मान पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ

भगवंत मान हे 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, मंत्रिमंडळ स्थापनेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 'आप' सरकारमध्ये समाविष्ट होणाऱ्या मंत्र्यांच्या नावांच्या निवडीबाबत पक्षाला कोणतीही घाई करायची नाही. त्यामुळेच सध्या भगवंत मान एकटेच शपथ घेणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आप पक्षाला प्रंचड बहुमत मिळवण्यात यश आले आहे.