झारखंड: मुल चोरीच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला बेदम मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
Mob Lynching( फाईल फोटो )

मुल चोरीच्या संशयावरुन एका युवकास जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. यात युवकाच्या डोक्याला गंभीर झाली असून जवळच्या रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे. ही घटना झारखंड येथे शनिवारी घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाकडून युवकाची सुटका केली. अन्यथा, युवकाला जीव गमवावा लागला असता, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

भटू सरदार असे या युवकाचे नाव आहे. भटू सरदार हा जमशेदपूर येथील रहीवासी आहे. मुल चोरीच्या संशयावरुन जमावाने भटू सरदार याला बेदम मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सिदगौडा पोलिस ठाण्याजवळ शनिवारी दुपारी घडली. सिडगौडाचे ठाण्याच्या पोलीस अधिकारी मनोज ठाकूर यांनी सांगितले की, या घटनेत भटू सरदार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. काही पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याची गर्दीतून सुटका केली. ताबोडतोब पोलिसांनी भटूला एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. हे देखील वाचा- कोल्हापूर: PUBG खेळाच्या अहारी गेल्याने महाविद्यालयीन तरूणाचं बिघडलं मानसिक स्वास्थ्य; उपचार अर्धवट सोडत हॉस्पिटल मधूनही काढला पळ

सध्या मुल चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. यामुळे अशाप्रकारच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्याच वेळी पोलिसांनी खुलासा केला की, याआधीही या जिल्ह्यात एका 50 वर्षीय व्यक्तीला मुल चोरीच्या संशयावरून प्राण गमवावे लागले होते.