Tomato | representative pic- (photo credit -pixabay)

Bengaluru: देशभरात टोमॅटो (Tomato) चे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. टोमॅटो वाचवण्यासाठी लोक आता विविध युक्त्या अवलंबत आहेत. तथापी, चोर देखील वेगवेगळ्या मार्गाने टोमॅटोची चोरी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये टोमॅटोच्या दुकानावर बॉन्सर तैनात करण्यात आले होत. त्याचवेळी, आता बेंगळुरूमध्ये काही चोरट्यांनी टोमॅटोने भरलेला ट्रक लुटला आहे. मात्र, आठवड्याभरापूर्वी कर्नाटकातूनही अशीच बातमी समोर आली होती.

बेंगळुरूजवळील चिक्काजाला येथे रोड रेजच्या नावाखाली तीन लोकांच्या टोळीने टोमॅटोने भरलेल्या ट्रकचा कथितपणे पाठलाग केला. बराच वेळ पाठलाग करून ट्रक थांबवून तो टोमॅटोने भरलेला ट्रक घेऊन पळून गेले. ट्रकमध्ये सुमारे अडीच टन टोमॅटो भरला होता. बाजारात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असून 100 ते 150 रुपये किलो दराने विकला जात आहे. (हेही वाचा - Tomato Price Hike: वाढत्या भावामुळे शेतातून झाली टोमॅटोची चोरी; शेतकऱ्याला लागला लाखोंचा चूना)

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर येथील मल्लेश हा शेतकरी शनिवारी कोलार येथे टोमॅटो घेऊन जात होता. टोमॅटोने भरलेल्या ट्रकने आरोपी ज्या कारमधून जात होते त्या कारला धडक दिली. यानंतर आरोपींनी शेतकरी व त्याच्या चालकाशी गैरवर्तन केले आणि भरपाईच्या नावाखाली मोठ्या रकमेची मागणी सुरू केली.

मात्र, शेतकऱ्याकडे पैसे नसल्याने त्याने आरोपींशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी ऐकले नाही. त्यानंतर आरोपींनी ट्रक लुटला. शेतकऱ्याने सांगितले की, प्रथम आरोपीने जबरदस्तीने ट्रक चालवण्यास सुरुवात केली आणि नंतर शेतकरी व चालकाला ढकलून दिले आणि तो टोमॅटोने भरलेला ट्रक घेऊन पळून गेला.

याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, ट्रकमध्ये सुमारे अडीच टन टोमॅटो होते, ज्याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये होती. मागील आठवड्यात, हसन जिल्ह्यातील बेलूर येथील एका शेतकऱ्याने 2.7 लाख रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती.