Retired Cop Shot Dead By Terrorists: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथील मशिदीत दहशतवाद्यांकडून निवृत्त वरिष्ठ पोलिसाची गोळ्या झाडून हत्या
Firing | Representational image (Photo Credits: pixabay)

Retired Cop Shot Dead By Terrorists: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir's) पोलिसांच्या एका निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची रविवारी बारामुल्ला (Baramulla) जिल्ह्यात मशिदीत नमाज अदा करत असताना दहशतवाद्यांनी (Terrorists) गोळ्या झाडून हत्या (Murder) केली. मोहम्मद शफी मीर असं या मृत अधिकाऱ्याच नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शफी मीर शहरातील गंतमुल्ला बाला भागातील स्थानिक मशिदीत अजान करत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

काश्मीर झोन पोलिसांनी याबाबत सोशल मीडिया अकाऊटवरून माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, दहशतवाद्यांनी श्री मोहम्मद शफी, गंटमुल्ला, शेरी बारामुल्ला येथे निवृत्त पोलीस अधिकारी यांच्यावर गोळीबार केला. मशिदीमध्ये अजानची नमाज पढत असताना ते जखमी झाले. त्यामुळे या परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. (हेही वाचा - Mobile Internet Closed In Poonch: पुंछ आणि राजौरीमध्ये मोबाईल इंटरनेट बंद, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू)

गेल्या महिन्यात श्रीनगरच्या ईदगाह मशिदीजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात राज्य पोलिसांचा एक पोलिस निरीक्षक गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. इन्स्पेक्टर मसरूर अहमद वानी श्रीनगरच्या ईदगाह मैदानावर स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळत असताना ही घटना घडली होती.