Maha Kumbh Mela 2025: सोमवारी पौष पौर्णिमेच्या (Paush Purnima) स्नानाने महाकुंभमेळ्याला (Maha Kumbh Mela 2025) सुरुवात झाली. सोमवारी दीड कोटी लोकांनी गंगेत धार्मिक स्नान केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी सर्व भाविक, संत, कल्पवासी आणि पर्यटकांचे स्वागत केले आणि त्यांना महाकुंभाच्या पहिल्या स्नानासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी महाकुंभ हे भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठेचे प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी X वर यासंदर्भात पोस्ट केली आहे. योगी यांनी लिहिले आहे की, 'मानवतेच्या शुभ पर्वामध्ये 'पौष पौर्णिमे'च्या शुभ प्रसंगी संगमात स्नान करण्याचा मान मिळालेल्या सर्व संत, कल्पवासी, भक्तांचे हार्दिक अभिनंदन. महाकुंभ 2025'. आज पहिल्या स्नान महोत्सवात, 1.50 कोटी सनातन भक्तांनी अखंड आणि स्वच्छ त्रिवेणीत स्नान करण्याचा पवित्र लाभ घेतला.'
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मानले आभार -
योगी आदित्यनाथ यांनी पुढे म्हटलं आहे की, 'पहिला स्नान महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाकुंभमेळा प्रशासन, प्रयागराज प्रशासन, उत्तर प्रदेश पोलिस, प्रयागराज महानगरपालिका, स्वच्छाग्रही, गंगा सेवा दूत, कुंभ मदतनीस, धार्मिक-सामाजिक संस्था, विविध स्वयंसेवी संस्था आणि माध्यम जगताने सहभाग घेतला. महाकुंभाशी संबंधित केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व विभागांचे मनापासून आभार! तुम्हाला तुमच्या सत्कर्मांचे फळ मिळो.' (हेही वाचा -Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळाच्या निम्मीत्ताने प्रयागराजमध्ये आकर्षक रोषणाई, खास लेसर शोचे आयोजन)
योगी आदित्यनाथ यांची एक्स पोस्ट -
मानवता के मंगलपर्व 'महाकुम्भ 2025' में 'पौष पूर्णिमा' के शुभ अवसर पर संगम स्नान का सौभाग्य प्राप्त करने वाले सभी संतगणों, कल्पवासियों, श्रद्धालुओं का हार्दिक अभिनंदन।
प्रथम स्नान पर्व पर आज 1.50 करोड़ सनातन आस्थावानों ने अविरल-निर्मल त्रिवेणी में स्नान का पुण्य लाभ अर्जित किया।…
— Yogi Adityanath (@myogiadityanath) January 13, 2025
पौष पौर्णिमेला गंगेत स्नान करण्याचे महत्त्व -
पौष पौर्णिमेला गंगेत स्नान करण्याचे महत्त्व स्पष्ट करताना, तीर्थयात्री पुजारी राजेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 15 व्या दिवशी म्हणजेच पौष पौर्णिमेला गंगेत स्नान केल्याने सर्व प्रकारची पापे धुऊन जातात. महिनाभर चालणाऱ्या कल्पवासाची सुरुवातही आज पौष पौर्णिमेने झाली. या काळात, लोक महिनाभर दिवसातून तीन वेळा गंगेत स्नान करून आणि परमेश्वराची प्रार्थना करतात. (हेही वाचा - Maha Kumbh Mela 2025 Begins Today: महाकुंभमेळ्याला आजपासून सुरुवात! पौष पौर्णिमेला शाही स्नानाने महाकुंभमेळ्याची सुरुवात, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर भाविकांनी केली गर्दी)
महाकुंभमेळ्याच्या पहिल्या दिवशी विक्रमी 1.5 कोटी भाविकांनी केले पवित्र स्नान -
#Story | Over 1 crore devotees take holy dip in Sangam area by 3 pm, as massive crowds throng Prayagraj for MahaKumbhMela2025; lakhs more expected to arrive #MahaKumbh2025 #Prayagraj #Sangam pic.twitter.com/19isjExjb6
— Lokmat Times Nagpur (@LokmatTimes_ngp) January 13, 2025
महाकुंभमेळ्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिला खास संदेश -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महाकुंभमेळ्यानिमित्त पोस्ट करताना लिहिले की, 'भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी एक खास दिवस, महाकुंभ 2025 प्रयागराजमध्ये सुरू झाला आहे, जिथे असंख्य लोक एका पवित्र संगमासाठी एकत्र येतील. महाकुंभ हे भारताच्या शाश्वत वारशाचे प्रतीक आहे. तेथे स्नान करण्यासाठी आणि संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या असंख्य लोकांना पाहून मी भारावून गेलो आहे. सर्व यात्रेकरू आणि पर्यटकांना मी उत्तम वास्तव्यासाठी शुभेच्छा देतो.'