Telangana: तेलंगणातील एका नामांकित रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका व्यक्तीचा उंदरांनी चावा घेतला. आयसीयू (ICU)मध्ये दाखल असलेल्या व्यक्तीच्या पायाला आणि हाताला उंदरांनी चावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याला खूप दुखापत झाली. दुसरीकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने रुग्णालयातील 2 डॉक्टरांना निलंबित केले आहे.
ही घटना तेलंगणातील वारंगल येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (Mahatma Gandhi Memorial Hospital, MGMH) मधील आहे. येथील रेस्पिरेटरी इंटरमीडिएट केअर युनिट (Respiratory Intermediate Care Unit, RICU) मध्ये उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीला उंदरांनी चावा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. 38 वर्षीय रुग्णाला फुफ्फुस आणि यकृताशी संबंधित आजार असून 26 मार्च रोजी त्याला आरआयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. (हेही वाचा -Big Change in MBBS Course: एमबीबीएस अभ्यासक्रमात मोठा बदल! विद्यार्थ्यांना गाव दत्तक घ्यावे लागणार; 'चरक शपथ' घेणंही असेल आवश्यक)
श्रीनिवासच्या कुटुंबीयांनी गुरुवारी आरोप केला की, त्याला उंदीर चावला होता. त्यामुळे त्याच्या पायाला आणि हाताला अनेक जखमा झाल्या आहेत. MGM वरंगल हे तेलंगणातील प्रमुख सरकारी रुग्णालयांपैकी एक आहे.
दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर सरकारने रुग्णालयाचे अधीक्षक बी श्रीनिवास राव यांची बदली केली. दुसरीकडे आरोग्य विभागाने ड्युटीवर असलेल्या दोन डॉक्टरांनाही निलंबित केले आहे.