Crime: खंडणीसाठी नऊ वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण करून हत्या, आरोपींचा शोध सुरू
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

एका धक्कादायक घटनेत, ट्रान्स-यमुना भागातील घूरपूर (Ghurpur) गावातून एका नऊ वर्षांच्या मुलाचे अपहरण (Kidnap) करून खंडणीसाठी (Extortion) अपहरणकर्त्यांनी त्याची हत्या (Murder) केली. शुक्रवारी औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्यांतर्गत (Industrial Area Police Stations) सांडवा परिसरात एका सेप्टिक टँकमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वृत्तानुसार, ऊर्जा विभागाचे कर्मचारी राजेश सिंह यांचा मुलगा नमन 21 जानेवारी रोजी रात्री त्याच्या शेजारच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी गेला असताना बेपत्ता झाला. राजेश सिंह यांच्या तक्रारीवरून घूरपूर पोलिसांनी अपहरणाचा एफआयआर दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले आणि संशयास्पद कार ओळखली. हेही वाचा Chartered Aircraft Crashes Video: राजस्थानातील भरतपूर येथे चार्टर्ड विमान कोसळले; मदत, बचाव कार्य सुरु (पाहा व्हिडिओ)

घूरपूर पोलिस स्टेशनचे एसएचओ अश्वनी कुमार यांनी सांगितले की, संशयित विकास आणि संजू यांना चौकशीसाठी घेरण्यात आले आणि त्यांनी मुलाच्या अपहरणात त्यांचा सहभाग असल्याची कबुली दिली. नमनच्या वडिलांकडून अनेक लाखांची खंडणी घ्यायची त्यांची योजना होती पण त्याला अटक होण्याची भीती होती. विकी आणि संजू यांनी नमनचा मफलरने गळा दाबून खून केला आणि त्याचा मृतदेह सांडवा कॉलनीतील सेप्टिक टँकमध्ये फेकून दिला.