Chartered Aircraft Crashes | (PC - ANI)

राजस्थान राज्यातील भरतपूर येथे चार्टर्ड विमान कोसळल्याची (Chartered Aircraft Crashes) धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, मदत आणि बचाव कार्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आलोक रंजन यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओही ( Chartered Aircraft Crashes Video) व्हायरल झाला आहे. विमान नेमके कोणत्या कारणामूळे कोसळले याबाबत अद्याप माहिती पुढे आली नाही. विमानात एकूण किती लोक होते याबाबतही माहितीची प्रतिक्षा आहे.

दरम्यान, भरतपूरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले. त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आजूबाजूला ढिगारा पसरलेला दिसत आहे. भरतपूरचे जिल्हाधिकारी आलोक रंजन यांनी चार्टर्ड विमान कोसळल्याच्या घटनेची पुष्टी केली आहे. (हेही वाचा, Sukhoi-30 and Mirage 2000 Aircraft Crash: सुखोई-30 आणि मिराज 2000 विमाने कोसळून अपघात, मध्य प्रदेशातील मुरैन परिसरातील घटना)

ट्विट

व्हिडिओ

संरक्षण सूत्रांनी पुष्टी केली आहे की भारतीय हवाई दलाचे विमान आसपासच्या परिसरात कोसळले आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी प्रतिक्षा करावी लागेल असेही ते म्हणाले.