Farmers Protest: कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहलं, सरकारने माझी शेवटी इच्छा पूर्ण करावी
प्रातिनिधिक प्रतिमा (फोटो सौजन्य- Pixabay, Open Clip Art)

Farmers Protest: कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी गेल्या 100 दिवसाहून अधिक काळापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनात सहभागी असलेल्या एका शेतकऱ्याने रविवारी सकाळी आत्महत्या केली. 55 वर्षांच्या या शेतकऱ्याने टिकरी-बहादूरगड सीमेवर गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. राजबीर सिंह असं या शेतकऱ्याचं नाव होत. राजबीर हे हिसार जिल्ह्यातील रहिवासी होते.

फाशी देण्यापूर्वी राजबीरने एक सुसाइड नोट लिहिली होती. ज्यामध्ये त्यांनी सरकारला तीन कृषी कायदे मागे घेण्याचे आवाहन केले आहे. राजबीर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, 'मी सरकारला हातजोडून विनंती करतो, मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण केली जाते, सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि शेतकऱ्यांना आनंदाने घरी पाठवावे, ही माझी शेवटची इच्छा आहे. (वाचा - Food Wastage: भारतामध्ये प्रत्येक वर्षी प्रती व्यक्ती 50 किलो अन्नाची नासाडी; UNEP च्या अहवालामधून धक्कादायक माहिती)

राजबीर यांनी सुसाइट नोटमध्ये पुढे लिहिलं आहे, शेतकरी बंधूंनो, माझा त्याग व्यर्थ जाऊ नये, हे तीनही काळे कायदे सरकारने रद्द केल्याशिवाय घरी जाऊ नका. सरकारने तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि शेतकऱ्यांना एमएसपीची हमी द्यावी.

दरम्यान, शनिवारी टीकरी बॉर्डरवर आंदोलनात भाग घेणारे शेतकरी जनक सिंह (वय 70) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जनक सिंह बऱ्याच काळापासून या आंदोलनात सामील होते. त्याचा मुलगा सुखविंदर सिंग यांनी सांगितले की, त्याचे वडील सतत चळवळीत भाग घेत होते. तिथेच त्यांची तब्येत अचानक खालावली.