Accident (PC - File Image)

Bihar: शुक्रवारी, पूर्व चंपारण जिल्ह्यातील कोतवा पोलीस स्टेशन हद्दीतील बांगरा चौकात (राष्ट्रीय महामार्ग-27) रस्ता ओलांडत असताना, एका अनियंत्रित कारने एका 70 वर्षीय वृद्धाला चिरडलेच नाही, तर त्याला आठ किमीपर्यंत खेचत नेलं. ही वयस्कर व्यक्ती गाडीच्या बोनेटला अडकली. आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोटवा कदम चौकाजवळील निर्जनस्थळी या वृद्धाला बोनेटवरून फेकून आणि चिरडून कारचालक फरार झाला. यात या वृद्धाचा मृत्यू झाला.

या वृद्धाचं नाव शंकर चौधरी असं होतं. तो कोतवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांगरा गावचा रहिवासी होता. या अपघातानंतर आणि उद्दामपणाने संतप्त लोकांनी महामार्ग रोखून धरला. असे घृणास्पद कृत्य करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. सीओ निरंजन कुमार मिश्रा यांच्या आश्वासनानंतर लोकांनी जाम हटवला. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. (हेही वाचा - Jammu Blast: जम्मू मध्ये Narwal भागात 2 स्फोट; 6 जण जखमी (Watch Video))

शंकर हे सायकलवरून रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी गोपालगंजकडून येणाऱ्या कारने त्याला धडक दिली आणि तो बोनेटमध्ये अडकला. घटनास्थळावरून स्थानिकांनी दुचाकीवरून कारचा पाठलाग केला. मात्र, कार चालक फरार झाला. पोलिस स्टेशनचे अध्यक्ष अनुज कुमार सिंह यांनी सांगितले की, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मोतिहारी येथे पाठवण्यात आला आहे.

दिल्लीत नववर्षाच्या रात्री एक वेदनादायक घटना -

देशाची राजधानी दिल्लीतील कांझावाला येथे नवीन वर्षाच्या रात्री अंजली या तरुणीसोबत एक हृदयद्रावक घटना घडली. अंजलीला एका कारने धडक दिली आणि तिला अनेक किलोमीटरपर्यंत ओढत नेले. तपासात समोर आले की, कारमधील सर्व आरोपींना अंजली कारच्या बोनेटखाली अडकल्याची माहिती होती, तरीही आरोपींनी कार थांबवली नाही. अंजलीला सुमारे 10 किलोमीटरपर्यंत ओढले गेले. यानंतर अंजलीचा मृत्यू झाला होता. पोलिसांवरही याप्रकरणी निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला होता.