Lady Shri Ram College Student Suicide: अभ्यासाशिवाय जिवंत राहू शकत नाही म्हणून दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
Representational Image (Photo Credits: File Image)

Lady Shri Ram College Student Suicide: दिल्लीतील प्रसिद्ध लेडी श्रीराम कॉलेज (Lady Shri Ram College) च्या विद्यार्थिनीने लॉकडाऊनमुळे शिक्षण बंद आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐश्वर्या, असं या मुलीचं नाव असून तिची घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. ऐश्वर्या मुळची तेलंगानातील रंगारेड्डी जिल्ह्यातील आहे. 2 नोव्हेंबर रोजी तिने आपल्या घरात आत्महत्या केली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात तिच्या आत्महत्येचं कारण उघडकीस आलं आहे. ऐश्वर्याचे वडील श्रीनिवास रेड्डी हे एक ऑटो मेकॅनिक असून तिची आई कपड्यांचे शिवण काम करते. ऐश्वर्याच्या मृत्यूमुळे तिच्या आई-वडीलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ऐश्वर्याला आयएएस व्हायचं होतं, पण लॉकडाऊनमुळे तिच्या स्वप्नांना मोठा धक्का लागला. लॉकडाऊनमुळे ऐश्वर्याच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली. त्यामुळे ऐश्वर्यासमोर अभ्यासासाठी दिल्लीत परत जाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. लॉकडाऊन दरम्यान या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, ऐश्वर्याच्या सातवीत शिकणाऱ्या बहीणीला शिक्षण सोडावे लागले होते. अभ्यासामध्ये अत्यंत हुशार असलेल्या ऐश्वर्याने तिच्या शाळेत प्रथम क्रमांक मिळवला होता. तिने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर देशातील सर्वोच्च महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. (हेही वाचा - Uttar Pradesh Crime: संतापजनक! छेड काढणाऱ्यांचा विरोध करणाऱ्या एका विद्यार्थीनीस जीवंत जाळले; उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील घटना)

ऐश्वर्याने तिच्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, "माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. मी माझ्या कुटूंबावर ओझे म्हणून राहू शकत नाही. मी अभ्यासाशिवाय जिवंत राहू शकत नाही आणि यावर केवळ मृत्यू हाचं माझ्यासाठी शेवटचा मार्ग आहे."

ऐश्वर्याचे वडील श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितलं की, ऐश्वर्याच्या दिल्लीतील पीजी निवासस्थानाचे भाडे 12,000 रुपये होते. मात्र, आम्ही तिला ऐवढे पैसे देऊ शकलो नाही. गेल्या वर्षी 2019 मध्ये ऐश्वर्याने दिल्लीतील लेडी श्री राम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, तेव्हा आम्ही तिच्या खर्चासाठी 1 बीएचके फ्लॅट तारण ठेवला होता. मी अजूनही कर्ज फेडत आहे, असंही ऐश्वर्याच्या वडीलांनी सांगितलं.

मी यावर्षी मार्चमध्ये मोटारसायकल दुरुस्तीचे दुकान उघडले. मात्र, लॉकडाऊन लागल्याने एका महिन्यातचं ते बंद करावे लागले. सध्या दुकान पुन्हा उघडले आहे. परंतु, व्यवसाय खूप कमी होत आहे. महाविद्यालय बंद झाल्यानंतर माझी मुलगी फेब्रुवारीमध्ये घरी परतली. ऑक्टोबरमध्ये, तिचे ऑनलाईन क्लास सुरू झाले. त्यासाठी तिला लॅपटॉप हवा होता. मात्र, लॅपटॉप खरेदी करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, असंही श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितलं.