
पंजाबमधील (Punjab) भटिंडा (Bhatinda) येथील गोदामात कीटकनाशके आणि खतांचा बेकायदेशीरपणे साठा केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी मंत्री कुलदीप सिंग धालीवाल यांनी दिली.
राज्याच्या कृषी विभागाच्या पथकांनी कीटकनाशक कंपन्यांच्या 15 गोदामांची तपासणी केली होती. तपासणी दरम्यान, केसी कॉम्प्लेक्स, सिव्हियन रोड येथे असलेल्या एका कंपनीच्या गोदामात मोठ्या प्रमाणात कीटकनाशके आणि खते बेकायदेशीरपणे साठवलेली आढळली, धालीवाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे. गोदामाचे मालक पंकज कुमार कीटकनाशके आणि खतांबाबत कोणतीही कागदपत्रे दाखवू शकले नाहीत, असे ते म्हणाले. हेही वाचा MP Shocker: एकाने जीवनाला कंटाळून, तर दुसऱ्याने प्रेयसीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न केल्यामुळे मित्रांची आत्महत्या
यानंतर भटिंडा येथे कीटकनाशक कायदा 1968, फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर 1985, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मंत्री पुढे म्हणाले की कीटकनाशकांचे आठ नमुने आणि खतांचे चार नमुने तपासले जातील. शेतकऱ्यांना निकृष्ट कीटकनाशके आणि खते विकणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, व्यापारी किंवा कंपनीला सोडले जाणार नाही, असेही ते म्हणाले.