Vizhinjam police station attack (PC - Twitter/ANI

Adani Port Protest: केरळच्या विझिंजम (Vizhinjam) भागात रविवारी रात्री अदानी बंदर (Adani Port) प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक चकमकीप्रकरणी 3000 हून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दंगल आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये पोलिसांनी महिला आणि मुलांविरुद्ध स्टेशनची तोडफोड आणि पोलिस कर्मचाऱ्यांना जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या हिंसाचारात 40 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अनेक स्थानिक जखमी झाल्याची माहिती आहे.

पोलिसांनी सांगितले की, शनिवारी नोंदवलेल्या गुन्ह्यातील आरोपी लिओ स्टॅनली, मुथप्पन, पुष्पराज आणि शँकी आणि इतर संशयितांची सुटका करण्याच्या मागणीसाठी सुमारे 3,000 लोक विझिंजम पोलिस स्टेशनमध्ये जमले होते. (हेही वाचा -Shraddha Murder Case: हत्येनंतर काही दिवसांनीचं आफताबने बनवली दुसरी गर्लफ्रेंड; भेट म्हणून दिली श्रद्धाची अंगठी)

एफआयआरमध्ये म्हटले आहे की, "लोखंडी रॉड, काठ्या, दगड आणि विटा घेऊन जमाव सायंकाळी 6 वाजता पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिस स्टेशनच्या आत पोलिसांना ओलिस घेतले. आरोपींना सोडले नाही तर पोलिस स्टेशन पेटवून देण्याची धमकी दिली. यात पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले आणि पोलिस स्टेशनमधील कार्यालयीन उपकरणे नष्ट झाली. हल्ल्यामुळे सुमारे 85 लाखांचे नुकसान झाले आहे." (हेही वाचा - Shraddha Murder Case: दोन वर्षांपूर्वी Aaftab ने श्रद्धाला केलं होतं रुग्णालयात दाखल; मुंबईतील डॉक्टरांचा खुलासा)

दरम्यान, हल्लेखोरांविरोधात आयपीसी कलम 143 (बेकायदेशीर सभा), 147 (दंगल), 120-बी (गुन्हेगारी कट), 447 (गुन्हेगारी घुसखोरी) आणि 353 (लोकसेवकावर हल्ला) यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.