Lok Sabha Election 2024: आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. या निवडणुकीत 47 कोटी महिलांसह 96 कोटी लोक मतदान करण्यास पात्र आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण भारतात 12 लाखांहून अधिक मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगा (Election Commission) च्या आकडेवारीनुसार मतदानासाठी पात्र असलेल्यांपैकी 1.73 कोटी पेक्षा जास्त 18 ते 19 वयोगटातील आहेत. 18 व्या लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी संसदीय निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी सुमारे 1.5 कोटी मतदान कर्मचारी तैनात केले जातील.
निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना पाठवलेल्या 2023 च्या पत्रानुसार, 1951 मध्ये भारतात 17.32 कोटी नोंदणीकृत मतदार होते, जे 1957 मध्ये वाढून 19.37 कोटी झाले. 2019 च्या निवडणुकीत 91.20 कोटी मतदार होते. (हेही वाचा -Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात भाजपचे मिशन 48, लोकसभा निवडणुकीसाठी नेत्यांवर मतदारसंघनिहाय जबाबदारी, पाहा यादी)
18 लाख दिव्यांग मतदारांचा समावेश -
मतदार यादीत नोंदणी केलेल्या एकूण मतदारांपैकी सुमारे 18 लाख दिव्यांग आहेत. पहिल्या लोकसभा निवडणुकीत 45 टक्के मतदान झाले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते 67 टक्के होते. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: 'महाराष्ट्रात 45 जागा जिंकू', महायुतीला विश्वास; 14 जानेवारीपासून जिल्हावार मेळावे सुरु)
दरम्यान, 2019 च्या निवडणुकांमध्ये भाजपचा विजय झाला होता. भाजपने लढवलेल्या 436 जागांपैकी 303 जागा जिंकल्या. हे निवडणूक यश पक्षाच्या एकूण 37.4 टक्के आणि त्यांनी लढवलेल्या जागांवर 46.1 टक्के अधिक प्रभावशाली मतांवर आधारित होते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील विजय हे भाजपसाठी महत्त्वपूर्ण आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यांच्या विधासभा निवडणुका पुढील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपसाठी मजबूत स्थिती दर्शवतात.