Uttar Pradesh Shocker: सात तरुणांनी मिळून ठेवले घोडीसोबत शारीरिक संबंध; लगाम वापरून केले घृणास्पद कृत्य, 4 आरोपींना अटक
7 youth gang-raped a mare (PC - Twitter)

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली (Bareli) जिल्ह्यात हाफिजगंज भागात एका घोडीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ एक्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. प्राणी हक्क कार्यकर्त्याने फिर्याद दिल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र, प्रकरण वाढवण्याचे टाळण्यासाठी पोलिस अधिकाऱ्याने 15,000 रुपये घेऊन आरोपी तरुणाला सोडून दिल्याचंही समोर आलं आहे. शेवटी, जेव्हा नेटिझन्सनी आरोपींनी केलेल्या क्रूरतेची बातमी शेअर केली तेव्हा 15,000 रुपयांसाठी आरोपीला सोडून देणाऱ्या इन्स्पेक्टरने, बरेली पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केल्याची माहिती दिली. (हेही वाचा -Viral Video: केरळमधील कन्नूरजवळील पेट्रोल पंपावरील मद्यधुंद व्यक्तीला अजगरासोबत फोटो काढण पडलं महागात; तुम्हीचं बघा काय घडलं)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी घृणास्पद कृत्य करताना दिसत आहे तर काहीजण या लज्जास्पद घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. या प्रकरणी हाफिजगंज पोलिस स्टेशनमध्ये संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस इतर आरोपींचा तपास घेत आहेत.

देवेंद्र, रिझवान आणि आमिर आणि अन्य एक अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी 22 ते 23 वयोगटातील आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.