Viral Video: केरळमधील कन्नूरजवळील पेट्रोल पंपावरील मद्यधुंद व्यक्तीला अजगरासोबत फोटो काढणं चांगलचं महागात पडलं आहे. केरळमध्ये एका व्यक्तीने हातात अजगर साप घेऊन पेट्रोल पंप गाठला. इतकंच नाही तर तो लोकांना त्याचा फोटो काढायला सांगू लागला. हे पाहून पंपावर उपस्थित नागरिकांमध्ये घबराट पसरली. कस तरी लोकांनी अजगराला त्याच्यापासून वेगळे केले. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण केरळमधील कन्नूरचे आहे. हातात अजगर घेऊन मद्यधुंद अवस्थेत एक व्यक्ती आल्याने येथील पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. लोकांना सापासोबत त्याचा फोटो काढण्यास सांगू लागला.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)