प्रेमाला वय नसतं, ते कोणत्याही वयात होऊ शकतं, असं म्हणतात. असाच एक धक्कादायक प्रकार ग्वाल्हेरमध्ये पाहायला मिळाला आहे. मुरैना जिल्ह्यातील 67 वर्षीय रामकली या 28 वर्षीय तरुणाच्या प्रेमात पडल्या असून ते दोघेही आता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live-in Relation) राहत आहेत.
दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. पण लग्न करायचे नाही, असे दोघांचे म्हणणे आहे. त्यामुळे लिव्ह-इन रिलेशनशिपला मान्यता देण्यासाठी या दोघांनी ग्वाल्हेर कोर्टाचा (Gwalior Court) उंबरठा गाठला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी दोघांनी कोर्टात नोटरी करून घेतली आहे. हे दाम्पत्य मुरैना जिल्ह्यातील कैलारस येथील रहिवासी असल्याचे वकील दिलीप अवस्थी यांनी सांगितले. (हेही वाचा - Pune Rape Case: पुण्यात 11 वर्षीय मुलीवर भरदिवसा शाळेत घुसून अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार; आरोपीचा शोध सुरू)
दरम्यान, 67 वर्षीय रामकली आणि 28 वर्षीय भोलू प्रेमात आहेत आणि त्यांना एकमेकांसोबत राहायचे आहे. पण लग्न करायचे नाही. लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहताना कोणताही वाद होऊ नये, म्हणून दोघांचीही नोटरी झाली आहे.
तत्पूर्वी, रामकली आणि भोलू ग्वाल्हेरच्या जिल्हा न्यायालयात पोहोचले. तिथे त्यांनी लिव्ह इन रिलेशनसाठी त्यांची कागदपत्रे सोबत घेतली आणि तिथे त्यांनी नोटरी करून घेतले. या दोघांनी सांगितले की, लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहताना भविष्यात कोणताही वाद होऊ नये म्हणून ते कागदपत्रांसह नोटरी करून घेण्यासाठी आले आहेत. वकील प्रदीप अवस्थी यांनी सांगितले की, अशा जोडप्यांना वाद टाळण्यासाठी लिव्ह-इन रिलेशनची नोटरी मिळते. परंतु, अशी कागदपत्रे कायदेशीर स्वरूपात वैध नसतात.